Rashmi Mane
केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांना बुधवारी 16 जुलैला येमेनमध्ये फाशी दिली जाणार होती. मात्र फाशी अखेर टळली आहे. निमिषा यांना फाशी होण्यापासून वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. या प्रकरणातील गांभीर्य पाहता निमिषा यांना वाचविणे शक्य नसल्याचे सांगितल जात होते.
निमिषा यांना वाचविण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरूच होते. तसेच भारतातील सुन्नी नेते कंथापुरम ए. पी. अबूबक्कर मुस्लियार म्हणजे ग्रँड मुफ्ती यांनी निमिषा यांच्या बचावासाठी प्रयत्न केले आहेत.
ग्रँड मुफ्ती यांनी येमेनमधील बड्या धार्मिक नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. या मध्यस्थीमुळे पहिल्यांदाच तलालचे कुटुंब चर्चेसाठी तयार झाले आहे
भारतीय ग्रँड मुफ्ती आणि ऑल इंडिया जमीयतुल उलेमाचे महासचिव आहेत.
त्यांना 'मुफ्ती शेख अबूबकर अहमद' या नावानेही ओळखलं जातं. 2018 मध्ये ग्रँड मुफ्ती यांच्या निधनानंतर अबुबकर यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.
कंठपूरम शेख अबूबकर अहमद हे भारतातील 10वे ग्रँड मुफ्ती आहेत. आणि दक्षिण भारतातून या पदावर पोहोचलेले ते पहिले मौलवी आहेत.
शेख अबूबकर यांचा जन्म 22 मार्च 1931 रोजी केरळमधील कोझिकोड येथे झाला.
त्यांचा इस्लामिक शिक्षणात गाढा अभ्यास आहे.
ग्रँड मुफ्ती फतवे (इस्लामिक कायदेशीर सल्ला) जाहीर करतात. धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवर मार्गदर्शन करणे हे त्यांचे प्रमुख काम आहे.
त्यांनी अरबी, उर्दू आणि मल्याळम भाषांमध्ये 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. तर 12,000 प्राथमिक, 11,000 माध्यमिक शाळा व 638 कॉलेज चालवतात.