सरकारनामा ब्यूरो
देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती आहे.
११ नोव्हेंबर २०१८ पासून हा दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा करतात.
मौलाना आझाद यांना 'भारतरत्न पुरस्कार' मिळाला आहे.
मौलाना आझाद हे राजकारणी, शास्त्रज्ञ आणि कवी होते.
शिक्षणाबरोबर सांस्कृतिक विकासासाठी मौलाना आझाद यांनी संगीत, नाटक आणि साहित्य अशा अनेक संस्ठांची स्थापना केली.
शिक्षणमंत्री असताना मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळणे हे मौलाना आझाद यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर मौलाना आझाद यांनी काँग्रेसच्या वतीने भारताच्या नवीन संविधान सभेसाठी निवडणूक लढवली होती.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले होते.
मौलाना आझाद यांनी महात्मा गांधींसोबत सविनय कायदेभंग आणि असहकार चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला.