सरकारनामा ब्यूरो
'आयएएस' इशिता किशोर यांनी 2020मध्ये 'यूपीएससी' परीक्षेत देशात पहिले स्थान मिळवले.
इशिता यांनी शालेय शिक्षण दिल्ली येथील 'एअर फोर्स बालभारती' या शाळेतून पूर्ण केले.
दिल्लीच्या 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स' येथून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.
'आयएएस' इशिता किशोर यांचे वडील हवाई दलात अधिकारी होते.
पहिल्या दोन प्रयत्नांत
पहिल्या दोन प्रयत्नात अयशस्वी झाल्यावरही इशिता यांनी हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले.
'राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध' हे पर्यायी विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली.
वडिलांचा आदर्श घेऊन इशिता यांनी देशसेवा करायचा निर्धार केला.
इशिता यांनी लहानपणीच 'आयएएस' अधिकारी व्हायचं ध्येय ठरवलं होतं.
'आयएएस' बनण्यासाठी इशिता यांच्या आईने त्यांना पाठिंबा दिला आहे.