Rashmi Mane
काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला ब्रिटीश अधिकारी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली.
'दिनशा एडलजी वाच्छा' अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापकस सदस्य आणि अध्यक्ष होते.
28-31 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पार पडले होते.
'अॅनी बेझंट' या 1917 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र आले होते. या सर्वांनी मिळून काँग्रेसची स्थापना केली होती.
महात्मा गांधी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर काँग्रेसशी जोडले गेले. गांधींचा राजकारणात प्रभाव होता त्यामुळे काँग्रेसचे मोठे संघटन निर्माण झाले होते.
गांधी 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या लोकप्रियतेला आणि सत्याग्रहाला त्या काळातील प्रमुख राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळाला.
नेहरु स्वतः 1951 ते 1954 पर्यंत अध्यक्ष होते. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते.
1959-60 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली, काँग्रेस हा एक प्रबळ गट बनला ज्याने सर्व जातीय भेद, गरिबी, अस्पृश्यता आणि धार्मिक आणि वांशिक विभागणी दूर करण्याचा प्रयत्न केला.
इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे हे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.