Pradeep Pendhare
‘दुनागिरी’, ‘संशोधक’ आणि ‘अग्रय’ या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचा आज कोलकता येथे नौदलात औपचारिक समावेश करण्यात आला.
नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने जहाजांची रचना केली असून, कोलकत्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स या शिपयार्डमध्ये उभारणी.
समुद्री युद्ध, सागरी सर्वेक्षण आणि पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी ही जहाजे भारतीय नौदलाची क्षमता अधिक भक्कम करणार
या तिन्ही युद्धनौकांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर करण्यात आला असून, त्यांच्या उभारणीत 200 हून अधिक एमएसएमई उद्योगांचा सहभाग आहे.New Warships
प्रोजेक्ट-17(A) अंतर्गत बांधण्यात आलेली 'दुनागिरी' ही पाचवी स्टेल्थ फ्रिगेट असून, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अत्याधुनिक सेन्सर आणि हवाई संरक्षण प्रणालींनी सज्ज युद्धनौका आहे.
‘संशोधक’ हे मोठ्या क्षमतेचे चौथे सर्वेक्षण जहाज असून, किनारी भागासह खोल समुद्रातील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी ते विकसित करण्यात आले आहे.New Warships
अरनाला वर्गातील ‘अग्रय’ हे चौथे अँटी-सबमरीन वॉरफेअर जहाज असून, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर आणि अत्याधुनिक सोनार प्रणालींनी सज्ज आहे.
उथळ समुद्रात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा मुकाबला करणे, अशी क्षमता या जहाजात आहे.
‘दुनागिरी’, ‘संशोधक’ आणि ‘अग्रय’मुळे देशाच्या सागरी सुरक्षेसह ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानालाही नवे बळ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.