Rashmi Mane
देशाची सेवा करण्याची आणि वर्दी घालण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी भारतीय नौसेनेनं मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SSC ऑफिसर भरती 2026 जाहीर झाली आहे.
Indian Navy SSC Officer Recruitment 2026 अंतर्गत एकूण 260 पदांवर भरती होणार आहे. ही संधी केवळ इंजिनिअरिंगच नव्हे, तर कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठीही खुली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सब लेफ्टनंट या पदावर होईल. आधुनिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रतिष्ठित करिअरची ही सुरुवात असेल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
या भरतीत एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, एज्युकेशन, लॉजिस्टिक्स, पायलट आणि सबमरीन टेक्निकल अशा महत्त्वाच्या शाखांचा समावेश आहे.
काही शाखांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांना संधी आहे. मात्र सबमरीनशी संबंधित काही तांत्रिक शाखा फक्त पुरुषांसाठी राखीव आहेत.
BE/B.Tech साठी किमान 60% गुण आवश्यक आहेत. लॉजिस्टिक्ससाठी MBA, B.Com, B.Sc, MCA, M.Sc पात्र आहेत. एज्युकेशन शाखेसाठी MA, MSc, M.Tech अशी पात्रता मागितली आहे.
सामान्यतः उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असावा. सुरुवातीचा पगार सुमारे 1.25 लाख प्रतिमहिना आहे तर भत्ते वेगळे असतील.