Rajanand More
भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र या नासामध्ये डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्लूझन विभागाच्या अध्यक्ष होत्या. नासातील टॉप अधिकाऱ्यांपैकी त्या एक होत्या.
नासाने नीला राजेंद्र यांची सेवा बरखास्त केल्याचा मेल नुकताच सर्व कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. त्यामुळे नासामध्ये खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खर्चात कपात करण्यासाठी देशातील सर्व डायव्हर्सिटी प्रोग्राम बंद करण्याच्या आदेशावर काही दिवसांपूर्वीच सही केली आहे. नीला यांचे पदही त्याअंतर्गत होते.
नीला राजेंद्र या नासामधील उच्चपदस्य अधिकारी असल्याने त्यांची नोकरी वाचविण्यासाठी नासानेच पुढाकार घेतला होता.
ट्रम्प यांच्या आदेशानंतर नासाने नीला यांच्या बचावासाठी त्यांच्या पदामध्ये बदल केला होता. मात्र, त्या मुळे विभागाचे काम पाहत होत्या.
नासाच्या प्रयत्नानंतर नीला राजेंद्र यांची नोकरी वाचू शकली नाही. ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन करत नासाने नीला यांची सेवा नुकतीच बरखास्त केली आहे. नील
नीला या 2021 पासून नासामध्ये कार्यरत होत्या. यादरम्यान त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने नासाकडून त्यांची नोकरी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र या उच्चशिक्षित आहेत. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि संगीत विषयात पदवी प्राप्त केली आहे. तसेच 2008 मध्ये त्यांनी वेक फॉरेस्ट विद्यापीठातून एमबीए पदवी मिळवली आहे.