सरकारनामा ब्यूरो
राजकारणी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गोविंद पानसरे यांचा जन्म अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील कोल्हार गावात झाला.
शेतमजूर असलेल्या आई-वडिलांच्या पोटी गोविंद पानसरे यांचा जन्म झाला. पाच भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते.
लहानपणी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या स्थानिक शाखेत ते सामील झाले होते.
संस्थेचे सदस्य गोविंद पत्कींनी त्यांना राहुरी येथील हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला, तेव्हाच त्यांचा साम्यवादाशी संबंध आला.
विधानसभा निवडणुकीत पी. बी. कडू-पाटील यांच्या प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शहाजी विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले.
विविध कामगार संघटना आणि झोपडपट्टीवासीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी कामगार कायद्याच्या विषयाचा सराव करण्यास सुरुवात केली.
महाविद्यालयात असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेत कम्युनिस्ट पक्षात ते सहभागी झाले आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.
R