Rajanand More
देशाच्या कोणत्या पंतप्रधान किती भाषा ज्ञात होत्या, बोलता येत होत्या, हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर ही स्टोरी वाचाच. यात आपण सात पंतप्रधानांची माहिती घेणार आहोत.
देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा या पदावर विराजमान होत इतिहास घडवला आहे. त्यांना केवळ तीन भाषांमध्ये बोलताना येते. ते गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये संवाद साधू शकतात.
देशाचे पहिले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही तीन भाषांचे ज्ञान होते. हिंदी, इंग्रजीबरोबरच ते उर्दू भाषाही बोलायचे.
‘जय जवान जय किसान’चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांनाही पंडित नेहरू यांच्याप्रमाणेच हिंदी, इंग्रजीसह उर्दू भाषेचे ज्ञान होते.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दोन-तीन नव्हे तर सहा भाषांचे ज्ञान होते. हिंदी आणि इंग्रजीबरोबरच पंजाबी, बंगाली, जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्ये संवाद साधू शकत होत्या.
पी. व्ही. नरसिंह राव यांना तब्बल 17 भाषांचे ज्ञान होते. एवढ्या भाषा माहिती असलेले ते एकमेव पंतप्रधान होते. त्यांना भारतातील 11 आणि परदेशातील सहा भाषा बोलता येत होत्या.
देशाचे पंतप्रधान झालेले अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले नेते होते. त्यांनाही हिंदी आणि इंग्रजीप्रमाणेच उर्दू भाषेचे ज्ञान होते. त्यांच्या कवितांमधून हिंदी-उर्दू भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्व दिसून येते.
डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते. पहिले पंजाबी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांना चार भाषा ज्ञात होत्या. पंजाबीसह हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषा त्यांना बोलता येत होत्या.