सरकारनामा ब्यूरो
तुमच्याकडे ओळखपत्र नसताना ही तुम्ही मतदान करु शकता ते कस चला पाहूयात....
निवडणूक आयोगाने ओळखपत्राशिवाय मतदान कसे करायचे या संदर्भात मार्गदर्शक नियम दिले आहेत. त्यानुसार तुम्ही मतदान करु शकता.
मार्गदर्शक नियमानुसार तुमच्याकडे ओळखपत्र नसले तरी पुढील पुरावे दाखवून तुम्ही मतदान करु शकता.
मतदाराचे नाव आणि ओळख सिद्ध करण्यासाठी पर्यायी ओळखपत्र दाखवू शकतो.
आधारकार्ड, पॅनकार्ड, बँककिंवा पोस्ट ऑफिस पासबूक,जाॅब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून मतदान करु शकतो.
पासपोर्ट, फोटो असलेला पेन्शन दस्तऐवज, आमदार, खासदार आणि विधानपरिषदेकडून आणलेले ओळखपत्र, राज्य-केंद्रसरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडून देण्यात आलेले सेवा ओळखपत्र दाखवू शकतो.
परदेशी मतदार असल्यास त्यांच्या नावाची भारतीय पासपोर्टनुसार मतदान यादीत नोंदणी केलेली असते. यामुळे त्यांचे मुळ पासपोर्टशिवाय कोणतेच दूसरे ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारले जात नाही.
मतदान ओळखपत्रात नावामध्ये काही छोट्या-मोठ्या चूका असल्या तरीदेखील मतदाराच्या ओळखीची खात्री झाल्यास मतदान करता येते.