Hrishikesh Nalagune
आर्किटेक्ट, लॉ, मेडिकल, फार्मसी अशा विविध क्षेत्रांच्या धर्तीवर आता इंजिनिअर्ससाठीही स्वतंत्र शिखर संस्था अस्तित्वात आली आहे.
‘इंडियन प्रोफेशनल इंजिनिअर्स कौन्सिल’ (IPEC) असे या संस्थेचे नाव आहे.
या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या इंजिनिअर्सची नोंदणी प्रस्तावित आहे.
व्यावसायिक इंजिनिअर्सची नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, नोंदणी रद्द करणे, व्यावसायिक म्हणून नियंत्रण करण्याची जबाबदारी IPEC कडे देण्यात येणार आहे.
व्यावसायिक इंजिनिअर्ससाठी व्यावसायिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची जबाबदारी आहे.
कायद्यातील नियम आणि उपनियमांद्वारे नोंदणीकृत इंजिनिअर्सवर नियंत्रण ठेवणे, ज्ञानाचा दर्जा राखणे, इंजिनिअर्समध्ये कौशल्य विकसित करणे आणि व्यावसायिक नितिमत्ता विकसीत करण्याची जबाबदारीही या संस्थेकडे असणार आहे.
या संस्थेकडे रजिस्ट्रेशन केलेल्या इंजिनिअर्सना प्रशिक्षण देणेही शक्य होणार आहे.
या सर्व गोष्टींमुळे इंडियन प्रोफेशनल इंजिनिअर्स कौन्सिल महत्त्वाची ठरणार आहे.