Rashmi Mane
रेल्वे अप्रेंटिसशिपच्या संधींची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नईमार्फत एकूण 1010 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 12 जुलै 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 ऑगस्ट 2025 पूर्वी अधिकृत वेबसाइट pb.icf.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.
या भरतीअंतर्गत विविध कौशल्याधारित ट्रेड्समध्ये पदे भरण्यात येणार आहेत, जसे की कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, पेंटर, वेल्डर आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (MLT).
फ्रेशर्ससाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी आणि विज्ञान शाखेसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर पूर्व-ITI पदांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारक उमेदवार पात्र आहेत.
फ्रेशर्ससाठी किमान वय 15 वर्षे आणि कमाल 22 वर्षे आहे; तर पूर्व-ITI उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क म्हणून सामान्य वर्गातील उमेदवारांना 100 रुपये ऑनलाइन प्रोसेसिंग फी भरावी लागेल. अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्कातून सूट दिली गेली आहे.
ही भरती युवकांना रेल्वेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत करिअर घडवण्याची उत्तम संधी देणारी आहे. इच्छुकांनी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा.