Rashmi Mane
भारतीय रेल्वे हे देशातील एक प्रमुख आणि विश्वासार्ह प्रवासाचे साधन आहे. रोज करोडो प्रवासी यामार्फत प्रवास करतात.
रात्री 10 वाजल्यानंतर भारतीय रेल्वेतील काही नियम बदलतात. हे नियम प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केले गेले आहेत.
रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान TTE तिकीट तपासू शकत नाही. प्रवाशांना झोपेत त्रास होऊ नये यासाठी हा नियम लागू केला आहे.
जर आपण प्रवासाची सुरुवात रात्री 10 नंतर केली असेल, तर TTE तिकीट तपासू शकतो. या नियमाचा अपवाद इथे लागू होतो.
रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे किंवा म्युझिक ऐकणे यास मनाई आहे. इतर प्रवाशांच्या झोपेचा विचार केला जातो.
रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मिडल बर्थ वापरण्याबाबत कोणताही प्रवासी (लोअर किंवा अपर बर्थ) आक्षेप घेऊ शकत नाही.
या नियमांचे पालन केल्याने सर्व प्रवाशांचा अनुभव अधिक शांततामय आणि सुखद होतो.