Ganesh Sonawane
रेल्वेच्या एसी कोचमधील प्रवाशांना बेडशीट, ब्लॅकेट, उशी आणि टॉवेल आदी गोष्टी प्रवास संपेपर्यंत वापरायला दिल्या जातात.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना थंडी वाजू नये, त्यांना आरामदायी झोप घेता यावी, यासाठी एसी कोचमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या सोयी दिल्या जातात.
प्रवासानंतर प्रवाशांनी सीट सोडताना त्या वस्तू अटेंडंटच्या ताब्यात देणे बंधनकारक असते. मात्र, असे न करता काही प्रवासी रेल्वेतील बेडशीट किंवा उशी चोरून घेऊन जातात. रेल्वे संपत्ती अधिनियम १९६६ अंतर्गत अशा प्रवाशावर कारवाई केली जाते.
रेल्वेच्या एसी कोचमधील चादर किंवा उशी चोरी करताना यात, पहिल्यांदा पकडला गेलात, तर जेल किंवा एक हजार रुपयांचा दंड भरावा लागतो.
संबंधित चोरीचा प्रकार वारंवार होत असेल व चोरीचा प्रकार गंभीर असेल तर दंडासह ५ वर्षांपर्यंत जेलची देखील शिक्षा होऊ शकते. किंवा जास्त पैशांचा दंड होऊ शकतो.
ट्रेन थांबवण्यासाठी फक्त आपत्कालीन परिस्थितीतच साखळी ओढण्याची परवानगी आहे. जर प्रवाशाने अयोग्य कारणासाठी साखळी ओढली तर १ हजार रूपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षेची तरतुद आहे.
रेल्वेत अस्वच्छता करणे देखील गुन्हा आहे. त्यावरही दंडात्मक कारवाई केली जावू शकते.
जर कुठल्या ट्रेनमध्ये असा प्रकार घडला, तर रेल्वे प्रशासन त्या प्रवाशाचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत आहे.