Rashmi Mane
सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे भरती मंडळाने (RRB) पॅरामेडिकल क्षेत्रातील पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 9 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2025 आहे.
▪️ नर्सिंग सुपरिटेंडंट - 272 पदे
▪️ फार्मासिस्ट - 105 पदे
▪️ मलेरिया इंस्पेक्टर - 33 पदे
▪️ लॅब असिस्टंट ग्रेड II - 12 पदे
▪️ डायलिसिस/ECG/एक्स-रे टेक्निशियन - प्रत्येकी 4 पदे
या सर्व पदांची भरती रेल्वे रुग्णालये व वैद्यकीय केंद्रांमध्ये होणार आहे. हे आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 21,700 ते 44,900 प्रतिमाह वेतन मिळेल. त्यासोबत HRA, DA व इतर शासकीय भत्त्यांचाही समावेश असेल.
प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगवेगळे असून शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची गरज आहे. नर्सिंग, फार्मसी, आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाशी संबंधित डिग्री किंवा डिप्लोमा आवश्यक आहे.
वयोमर्यादा संबंधित पदावर अवलंबून आहे. किमान वय 18-20 वर्षांपासून तर कमाल वय 33-40 वर्षांपर्यंत आहे. राखीव वर्गांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.