Rashmi Mane
कशिश मित्तल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, पण त्यांची खरी कहाणी यापेक्षा खूप मोठी आहे.
कशिश यांचा जन्म पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते.
12वीनंतर IIT JEE परीक्षा दिली आणि देशात 6वी रँक मिळवत ते IIT दिल्लीमधून B.Tech पुर्ण केलं.
IIT नंतर कशिश यांनी UPSC परीक्षा दिली आणि वयाच्या 21व्या वर्षी 58वी रँक मिळवत IAS झाले.
त्यांनी AGMUT कॅडरमध्ये अधिकारी म्हणून काम केलं. तवांग (अरुणाचल प्रदेश), चंदीगड आणि नीती आयोगात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
IAS नोकरी सोडून 2020 मध्ये कशिश मायक्रोसॉफ्टमध्ये प्रिन्सिपल रिसर्च प्रोग्राम मॅनेजर बनले. त्यांनी AI प्रोजेक्ट्सवर काम केलं.
आणि आता मार्च 2025 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडून बेंगळुरूमध्ये Disha AI नावाचा स्टार्टअप सुरू केला, जो आता गुंतवणूकदारांच्या पाठबळासह वेगाने वाढतो आहे.
कशिश मित्तल हे एक प्रेरणादायी उदाहरण आहेत. ज्यांनी IIT, UPSC, टेक्नॉलॉजी आणि संगीत या सगळ्यांमध्ये आपली छाप पाडली आहे.