Rashmi Mane
सामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारतीय रेल्वेकडून जनरल डब्यांसाठी सुविधेत वाढ केली आहे.
2024-25 मध्ये 1250 जनरल डबे विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वापरण्यात आले.
रेल्वे पुढील 5 वर्षांत 17,000 बिगर वातानुकूलित जनरल/स्लीपर डब्यांचे उत्पादन करणार आहे.
22 डब्यांच्या रचनेत आता 12 जनरल आणि स्लीपर, तसेच 8 एसी डब्यांचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे पॅसेंजर, मेमू, ईएमयू गाड्याद्वारे अनारक्षित प्रवाशांची गरज भागवते.
बिगर वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस गाड्या प्रवाशांना आधुनिक अनुभव देतात.
आज 70% डबे बिगर वातानुकूलित आहे. पुढील टप्प्यात विशेष उत्पादन कार्यक्रम.