Rashmi Mane
रेल्वे प्रवासात जेवणावर जास्त खर्च होतो का? आता काळजी नको! रेल्वे मंत्रालयाने जाहीर केला आहे व्हेज मीलचा स्टँडर्ड मेनू आणि दर.
देशात कोट्यावधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आता या मेनूमुळे प्रवाशांना दर्जेदार आणि परवडणारे जेवण मिळणार.
रेल्वे मंत्रालयाने ‘X’ वरून शाकाहारी जेवणासाठी निश्चित दर आणि संपूर्ण मेन्यू पोस्ट केला आहे.
ट्रेनमध्ये मिळणाऱ्या व्हेज मीलची किंमत – 80
स्टेशनवर मिळणाऱ्या व्हेज मीलची किंमत – 70
2 पराठे / 4 रोट्या (100g), भात (150g) ,डाळ / सांभार (150g), भाजी (100g), दही (80g), लोणचं (12g)
आता ट्रेनमध्ये भूक लागली, तरी टेन्शन नाही! रेल्वेने दिली खात्री हे जेवण आहे पौष्टिक, दर्जेदार आणि किफायतशीर.
कोणताही वेंडर जास्त पैसे मागत असेल किंवा जेवणाची गुणवत्ता बरोबर नसेल, तर लगेच तक्रार करा!
139 वर कॉल करा तुमचं मत नोंदवा लगेच होईल कारवाई.
Rail Madad App वापरा तसेच या वेबसाईटवर railmadad.indianrailways.gov.in. तुम्ही तक्रार करू शकता.