Rashmi Mane
नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) म्हणजेच सेबी मध्ये भरती निघाली आहे.
सेबीने ऑफिसर ग्रेड-ए (असिस्टंट मॅनेजर) या पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना www.sebi.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून, उमेदवारांना निश्चित वेळेत अर्ज सादर करावा लागेल.
सेबीच्या अधिसूचनेत विविध विभागांमध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षेची पद्धत आणि वेतनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
या भरतीसाठी वेगवेगळ्या विभागानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी.
मास्टर्स डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, लॉमध्ये बॅचलर डिग्री, इंजिनियरिंगमधील बॅचलर डिग्री, चार्टर्ड अकाउंटंट (CA), चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (CFA), कंपनी सेक्रेटरी (CS), कॉस्ट अकाउंटंट किंवा इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये पदवी.
सेबीमधील असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे. फेज 1 लेखी परीक्षा, फेज 2 लेखी परीक्षा आणि शेवटी इंटरव्ह्यू. सध्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, सेबी लवकरच परीक्षा वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकूण मासिक पगार 1,84,000 इतका असेल. यामध्ये मूलभूत वेतनासोबत विविध भत्ते आणि सुविधांचा समावेश असेल.