Ganesh Sonawane
रेल्वे मंत्रालयाने तत्काळ बुकिंगच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. 1 जुलै 2025 पासून नव्या अटी लागू होणार आहेत.
1 जुलैपासून तत्काळ बुकिंग करताना आधार ओटीपी आवश्यक असेल. रेल्वेच्या नव्या नियमामुळे एजंटांच्या बुकिंगवर मर्यादा येणार आहेत.
इथून पुढे तत्काळ तिकिटे फक्त IRCTC च्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे बुक करता येणार आहेत.
आधार क्रमांकावर ओटीपी येऊनच तिकिट बुकिंग पूर्ण होईल. ही अट 15 जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार आहे.
तत्काळ विंडो उघडल्यानंतर पहिले 30 मिनिटे अनधिकृत एजंट बुकिंग करू शकणार नाहीत. सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीटे सहज बुक करता यावीत यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवीन प्रणालीमुळे अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. तिकीट बुकिंगचा फायदा आता थेट प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने तिकिटांच्या किमतीत किंचित वाढ करण्याची घोषणा केली आहे.
नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर 1 पैशाने वाढणार आहे, तर एसी क्लासमध्ये 2 पैसे प्रति किलोमीटर भाडे वाढणार आहे.