Rashmi Mane
इराणने उगारलेलं हुकमी अस्त्र; भारतासह जगभरातील देशांत खळबळ.
आशिया व मध्य पूर्वेला जोडणारी अरुंद समुद्री वाट. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा जगातील एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्ग आहे. दररोज जवळपास 2 कोटी बॅरल तेल याच मार्गाने जगभर पोहोचते.
राजकीय तणाव वाढल्यास इराणने अनेकदा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची चेतावणी दिली आहे. हे इराणचं ‘तेल’ हत्यार आहे!
होर्मुझ बंद झाल्यास तेलाच्या किंमती आकाशाला भिडू शकतात. याचा परिणाम थेट भारतासह संपूर्ण जगावर होईल.
भारत 85% कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. होर्मुझ बंद झाल्यास पुरवठा तुटेल, किंमती वाढतील, महागाई उसळी घेईल.
सौदी अरेबिया व UAE यांनी पाइपलाईनद्वारे रेड सीमार्गे काही तेल वाहतूक सुरू केली आहे. मात्र हे प्रमाण फारच मर्यादित आहे.
होर्मुझ बंद झाल्यास जगात आर्थिक अस्थिरता, युद्धसदृश स्थिती आणि घबराट निर्माण होऊ शकते.