रेल्वेत RAC तिकिटावरही मिळणार आता बेडशीट, चादर

Ganesh Sonawane

रेल्वेचा RAC प्रवाशांना मोठा दिलासा

आरएसी तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बेडशीट, चादर मिळणार आहे. यामुळे साइड लोअर सीट शेअर करणाऱ्या प्रवाशांना बेडरोलची सुविधा मिळेल.

RAC Ticket, Railway Bedroll

RAC तिकीट म्हणजे काय?

RAC म्हणजे Reservation Against Cancellation. उपलब्ध जागांपेक्षा आरक्षणाची मागणी जास्त असल्यास RAC तिकीट दिले जाते. दोन RAC प्रवाशांना साइड लोअर सीट शेअर करावी लागते.

RAC Ticket, Railway Bedroll

सीट कन्फर्म होण्याचीही शक्यता

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाने आरक्षण रद्द केल्यास ती जागा RAC तिकीटधारकाला मिळते. मात्र कन्फर्मेशन न झाल्यास दोन RAC प्रवाशांना एक साइड लोअर सीट शेअर करावी लागते.

RAC Ticket, Railway Bedroll

2009 मध्येच काढले होते परिपत्रक

RAC धारकांना स्वतंत्र बेडरोल देण्याबाबत 2009 मध्ये कमर्शियल सर्क्युलर नंबर 50/2009 काढण्यात आले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

RAC Ticket, Railway Bedroll

ऑगस्टला पुन्हा रेल्वेचे निर्देश

रेल्वे प्रशासनाने 4 ऑगस्ट 2026 रोजी नवीन परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकातून RAC धारकांना स्वतंत्र बेडरोल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RAC Ticket, Railway Bedroll

कोणत्या डब्यांमध्ये सुविधा मिळणार?

AC 3-Tier, AC 2-Tier आणि AC First मधील RAC तिकीटधारकांना बेडरोलची सुविधा मिळणार आहे. मात्र AC Chair Car मधील RAC प्रवाशांना ही सुविधा मिळणार नाही.

RAC Ticket, Railway Bedroll

पंचवटी-विदर्भ एक्स्प्रेसचे उदाहरण

पंचवटी एक्स्प्रेसच्या मुंबई-मनमाड AC डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेडरोल मिळत नाही. मात्र विदर्भ एक्स्प्रेसच्या मुंबई-मनमाड AC डब्यातील प्रवाशांना बेडरोलची सुविधा मिळते.

RAC Ticket, Railway Bedroll

पूर्ण पैसे, मात्र सुविधा नव्हती

RAC प्रवाशांकडून कन्फर्म तिकीटधारकांप्रमाणेच पूर्ण शुल्क आकारले जात होते. मात्र सुविधा मिळत नसल्याने RAC प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

RAC Ticket, Railway Bedroll | Sarkarnama

NEXT : FIR, NC आणि तक्रार अर्ज, नेमका फरक काय? एका क्लिकवर समजून घ्या..

येथे क्लिक करा