Rashmi Mane
रेल्वेमध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी! रेल्वे भरती मंडळ (RRB) तब्बल 1 लाखाहून अधिक नोकऱ्या देणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात 50,000 हून अधिक उमेदवारांची भरती होणार आहे.
आगामी 2026-27 मध्ये देखील 50,000+ जागांवर भरती प्रस्तावित आहे. एकूण 1.08 लाख भरतीची योजना रेल्वेने जाहीर केली आहे.
नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 1.86 कोटी उमेदवारांसाठी CBT परीक्षा घेण्यात आल्या आहेत.
2025-26 च्या पहिल्या तिमाहीतच रेल्वेने 9000 पेक्षा अधिक नियुक्त्या पूर्ण केल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, CBT Computer Based Test परीक्षा घेणं हे प्रचंड नियोजन आणि समन्वयाचं काम आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही रेल्वे भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते! आजच तयारीला सुरुवात करा!