Jagdish Patil
'वंदे मातरम'ला 150 वर्षे झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी या गीताचे तुकडे केल्याचा आरोप PM नरेंद्र मोदींनी केला.
मोदींचे आरोप काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी खोडून काढले. पंतप्रधान तथ्यांना वगळून आरोप करतात. निवडक प्रसंगांचा वापर करून ते दिशाभूल करतात, असं त्या म्हणाल्या.
याच पार्श्वभूमीवर 'वंदे मातरम' गीताचा राजकीय प्रवास जाणून घेऊ. या गीताची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली बंगाली आणि संस्कृतमध्ये केली.
त्यानंतर 1881 साली प्रकाशित झालेल्या बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत गीताचा समावेश होता.
1896 साली कलकत्त्यात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी या गीताचे पहिले सादरीकरण केले.
1905 साली बंगालच्या फाळणीविरोधातील आंदोलनादरम्यान हे गीत देशभरात पसरले. मात्र, त्याचवेळी मुस्लिम लीगने या गीताला कडाडून विरोध केला.
या परिस्थितीत काँग्रेस कार्यकारी समितीने हस्तक्षेप करत 1937 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ठराव स्वीकारला.
ज्यामध्ये, राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायले जात असल्यास, आक्षेप नसलेली फक्त पहिली दोनच कडवी गायली जावीत, असा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रम आयोजकांना, ‘वंदे मातरम्’ व्यतिरिक्त किंवा त्याच्या ऐवजी, कुठेही आक्षेपार्ह नसलेले इतर कोणतेही गीत गाण्याची पूर्ण मुभा असावी,” अशी शिफारस कार्यकारी समितीने केली.
राष्ट्रगीताची निवड करण्याचा प्रश्न घटनाप्रस्ताव सभेपुढे आला तेव्हा, रवींद्रनाथ टागोरांचे 'जन गण मन' हे गीत निवडले गेले.
1948 साली नेहरूंनी मंत्रिमंडळाला पाठवलेल्या एका नोंदीत, 'जन गण मन हे गीत वाद्यवृंदासाठी अनुकूल आहे, तर वंदे मातरम् भारतीयांनी श्रद्धेने मानलेले गीत असल्याचं स्पष्ट केलं.