Rashmi Mane
जागतिक आर्थिक दबाव वाढत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशासाठी महत्त्वाचा ‘3F’ मंत्र जाहीर केला आहे. फ्यूल, फर्टिलायझर आणि फॉरेन एक्सचेंजवर अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘3F’ मध्ये Fuel, Fertilizer आणि Foreign Exchange या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. या तिन्ही क्षेत्रांवरील वाढता खर्च भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
गल्फ देशांतील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुज परिसरातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले असून भारतालाही त्याचा मोठा फटका बसत आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्यांदा वाढवले. काही दिवसांतच इंधन जवळपास 7.5 ते 8 रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महागले की त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या खिशावर होतो.
सोनं, खतं आणि इंधन आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागतं. त्यामुळे डॉलरची मागणी वाढून भारताच्या विदेशी चलन साठ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होतो.
पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्युटी कमी केल्यामुळे केंद्र सरकारला 2027 आर्थिक वर्षात तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा महसुली फटका बसू शकतो, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
अर्थमंत्री सितारमण यांनी सरकारी कंपन्यांना 45 दिवसांत MSME कंपन्यांचे पेमेंट करण्याचे निर्देश दिले. सध्या सुमारे 8.1 लाख कोटी रुपयांची देणी अडकली असून छोट्या उद्योगांवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.