Aslam Shanedivan
देशातील कांदा उत्पादकांचे होणारे नुकसात थांबवून त्याचे नियंत्रण शेतकऱ्यांच्या हाती आणण्यासाठी जगातील पहिले आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कांदा भवन हे सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे दोन एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून नंतर त्याचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी दाजे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे
याद्वारे कांदा शेती सुरक्षित व शाश्वत नफ्याची बनविण्यासह बिनभरवशाची व कर्जावर चालणाऱ्या कांदा शेतीचे स्वरुप पूर्णत: बदलण्यासाठी मदत होणार आहे
तसेच राष्ट्रीय कांदा भवनात अद्ययावत सुविधा केंद्रासह कांदा तपासणी प्रयोगशाळाही सुरू करण्यात येईल
तर या माध्यमातून कांदा बियाणे संशोधन, दर्जा नियंत्रण, रोपांचे संगोपन, लागवडींनंतरची खते व औषधाचे शास्त्रीय नियोजनासह उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात येईल
तसेच या भवनामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शकता येणार असून शेतकऱ्याची आर्थिक लूट किंवा फसवणूक रोखली जाणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना नफा आणि ग्राहकांना माफक दरात कांदा मिळावा यासाठी थेट विक्री साखळीसह दलालांचा सहभाग कमी केला जाणार आहे.
तर नफ्याची व भविष्य सुरक्षित करणाऱ्या कांदा भवनामुळे कांदा शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा संघर्ष कमी होणार आहे.