सरकारनामा ब्यूरो
किरण बेदी या देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत.
कायम नियमानुसार चालणाऱ्या किरण यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कार त्यांनी बाजूला केली होती.
तिहार तुरुंगातील कैद्यांसाठी साक्षरता कार्यक्रमासोबत योगा आणि विपश्यना ध्यान सरावही त्यांनी सुरू केला होता.
'नवज्योती आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन' या दोन संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. ड्रग्ज व्यसनी आणि महिलांसाठी या संस्था काम करतात.
1972 मध्ये झालेल्या आशियाई लॉन टेनिस चॅम्पियनशिपसारख्या अनेक विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी जिंकल्या.
नो पार्किंग गाड्यांना बाजूला सरकवण्यासाठी वारंवार क्रेनचा वापर केल्यामुळे लोकांनी त्यांना 'क्रेन बेदी' हे टोपण नाव दिले होते.
किरण बेदी यांनी महाविद्यालयात राज्यशास्त्राच्या व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
दक्षिणेत प्रचंड हिट झालेल्या 'कर्तव्यम' नावाच्या तेलुगू चित्रपटात त्यांचे जीवन चित्रण करण्यात आले आहे.
R