Rashmi Mane
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही, अनेक विद्यार्थी प्रचंड मेहनतीनंतर आणि प्रयत्नांनंतर उत्तीर्ण होतात.
मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात पास होणारे काहीजण असतात. याच यूपीएससी उमेदवारांच्या यादीत 21 वर्षीय IAS अन्सार शेख यांचे नाव येते.
अन्सार शेख तरुण आयएएस अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जालना जिल्ह्यातील अन्सार शेख यांचे वडील ऑटोरिक्षा चालक होते. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची, आर्थिक अडचणींमुळे अन्सारच्या मोठ्या भावाला सातवीत शिक्षण सोडावे लागले.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही अन्सार यांनी मेहनत सुरूच ठेवली.
आर्थिक संकटात असताना अन्सार शेखने आपले शिक्षण पूर्ण केले आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.
अन्सार शेख 2016 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले. पहिल्याच प्रयत्नात 361 वा क्रमांक मिळवून ते आयएएस अधिकारी बनले.
R