सरकारनामा ब्यूरो
गांधीजींच्या डॉ. सुशीला नायर या स्वतंत्र दिल्लीच्या पहिल्या आरोग्य मंत्री होत्या.
डॉ. सुशीला नायर या आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि कुष्ठरोगींच्या कल्याणासाठी लढल्या.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांचे जीवन संघर्ष आणि संकटांनी भरलेले होते.
दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली.
बिकट परीस्थितीतूनही कष्ट करत त्या डॉक्टर बनल्या आणि केवळ महात्मा गांधींची नाही तर सगळ्या जनतेची काळजी घेतली.
त्या काळात त्यांनी देशाला अंधश्रद्धा विरहित आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मार्गावर आणले.
आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या व्यक्तींना मोफत आणि योग्य आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी त्यांनी साबरमती आश्रमात एक छोटासा दवाखाना सुरू केला होता.
सेवाग्राममध्ये कॉलरा झाल्यावर त्यांच्या वैद्यकीय ज्ञानामुळे लवकरच या आजाराशी एकट्याने यशस्वी लढा देत लोकांना खंबीरपणे मदत केली.
देशासाठी निर्भयपणे लढणाऱ्या अनेक बलवान महिलांपैकी सुशीला या दिल्लीच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री बनल्या.