Kolkata Underwater Metro : देशाच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोची 'ही' आहेत वैशिष्ट्ये...

सरकारनामा ब्यूरो

देशाची पहिली पाण्याखालील मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोलकाताच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो विभागातील देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन झाले.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

जनतेसाठी मेट्रो खुली

भव्य उद्घाटनानंतर या मेट्रोची सेवा जनतेसाठी खुली करण्यात आली आहे.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

10.8 किमी अंडरग्राऊंड

१६.६ किमी लांबीची ही मेट्रो हावडा मैदान ते फुलबागानपर्यंत सुमारे 10.8 किमी जमिनीखालून आहे.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

सर्वात खोल बोगद्याचा समावेश

हुगळी नदीखालील देशातील सर्वात खोल बोगद्याचा यात समावेश आहे. याचा एक भाग हावडा आणि सॉल्ट लेक यांना जोडतो.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

सहा स्टेशन

अंडरवॉटर मेट्रोचे सहा स्टेशन्स असून त्यापैकी तीन अंडरग्राऊंड आहेत.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

जलद आणि कार्यक्षम मेट्रो

अवघ्या 45 सेकंदात 520 मीटर नदीचा पट्टा कव्हर करत असल्याने ही एक जलद आणि कार्यक्षम मेट्रो आहे.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

ATO प्रणाली

ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (ATO) यासारख्या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

सोईस्कर अन् परवडेल असे दर

प्रवासासाठी याचे तिकीट दरही सगळ्यांना सोईस्कर आणि परवडेल असे दर आहेत. साधारणत: 5 रुपये ते 50 रुपयांपर्यंत याचे दर आहेत.

Kolkata Underwater Metro | Sarkarnama

Next : यूपीएससीत दोनदा यश मिळवणाऱ्या आयएएस...

येथे क्लिक करा