Defence Womens : भारतीय सैन्य दलातील 'या' महिला अधिकाऱ्यांनी रचला इतिहास

सरकारनामा ब्यूरो

कॅप्टन सुरभी जाखमोला

भारतीय लष्करातील 117 रेजिमेंटच्या अभियंता कॅप्टन सुरभी जाखमोला या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

Captain Surbhi Jakhmola | Sarkarnama

कॅप्टन शिवा चौहान

सियाचीनमधील कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

Shiva Chauhan | Sarkarnama

कॅप्टन शालिजा धामी

भारतीय हवाई दलातील कॅप्टन शालिजा धामी या IAF मध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळवणाऱ्या आणि फ्लाइट कमांडर बनलेल्या पहिल्या महिला आहेत.

Shaliza Dhami | Sarkarnama

लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली

लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली या भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी तसेच तुपोलेव्ह Tu-142 वरील नौदलाच्या पहिल्या महिला निरीक्षक देखील आहेत.

Prerna Deosthalee | Sarkarnama

स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाधी

स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाधी या भारतीय हवाई दल अधिकारी आहेत, त्यांची भारतातील पहिल्या महिला Aide-De-Camp (ADC) म्हणून नियुक्ती झाली आहे.

Manisha Padhi | Sarkarnama

विंग कमांडर दीपिका मिश्रा

विंग कमांडर दीपिका मिश्रा या 58 जवानांपैकी आहेत, ज्यांना हवाई दल प्रमुखांच्या नियुक्ती समारंभात शौर्य पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या IAF महिला अधिकारी आहेत.

Deepika Misra | Sarkarnama

कर्नल सुचिता शेखर

कर्नल सुचिता शेखर या कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट बटालियनची कमांड स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

Colonel Shuchita Shekhar | Sarkarnama

कर्नल गीता राणा

कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा यांनी पूर्व लडाख प्रदेशात स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची कमान हाती घेतली आहे.

Colonel Geeta Rana | Sarkarnama

कर्नल सुनीता बी. एस.

आर्मी मेडिकल कॉर्प्समधील अधिकारी कर्नल सुनीता बीएस या आर्म्ड फोर्सेस ट्रान्सफ्युजन सेंटर (एएफटीसी) मध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

Col Sunita | Sarkarnama

पाच महिला कॅडेट्स

साक्षी दुबे, अदिती यादव, पवित्र मुदगील, आकांशा आणि मेहक सैनी या सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये लढाऊ भूमिकेत कमिशन मिळविणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

Five Women Cadets | Sarkarnama

Next : यावर्षी 'हे' दिग्गज ठरले पद्म भूषण पुरस्काराचे मानकरी

Sarkarnama
येथे क्लिक करा