सरकारनामा ब्यूरो
दीपक धर हे सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ आहेत. या क्षेत्रातला बोल्टझमन पदक मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. भौतिक शास्त्रातील योगदानासाठी त्यांना 2023 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आधुनिक भारतातील लोकप्रिय कादंबरीकार संतशिवरा लिंगनय्या भैरप्पा हे एक तत्त्वज्ञ आणि पटकथा लेखक आहेत जे कन्नड भाषेत लिहितात.
दाजी म्हणून ओळखले जाणारे कमलेश डी. पटेल हे नेता, लेखक आणि सहजयोगी आध्यात्मिक साधनेचे योगी आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू कपिल कपूर हे भाषाशास्त्र आणि साहित्याचे विद्वान म्हणून परिचित आहेत.
भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती असलेले कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या परोपकारी वृत्तीसाठीही परिचित आहेत.
भारतीय शिक्षणतज्ज्ञ, लेखिका सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. दानशूरपणासाठीही त्या प्रसिद्ध आहेत.
सुमन कल्याणपूर या शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, ओडिया आणि पंजाबी याशिवाय अनेक भाषांमधील चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत.
हे एक भारतीय धार्मिक गुरु आणि योगी तपस्वी आहेत. जे त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी ओळखले जातात. तसेच भारत आणि अमेरिका येथे ते आध्यात्मिक केंद्रे चालवतात.
"आधुनिक भारताची मीरा" म्हणून संबोधले जाणाऱ्या वाणी यांनी 10,000 गाण्यांच्या रेकॉर्डिंगसह एक हजाराहून अधिक भारतीय चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले.