Indigo Airlines : 3 गोष्टींसाठी झाली होती 'इंडिगोची' सुरुवात : कोण आहेत मालक?

Rashmi Mane

इंडिगो सध्या मोठ्या संकटात

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटातून जात आहे. देशभरात अचानक मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होत आहेत त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

60% मार्केट शेअरसह

भारताच्या देशांतर्गत विमान बाजारपेठेत 60% पेक्षा जास्त हिस्सा असलेल्या इंडिगोलाच ऑपरेशनल संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे कंपनीची प्रतिमा आणि आर्थिक स्थिती दोन्ही डगमगत आहेत.

सलग दोन दिवस 200+ उड्डाणे रद्द

मंगळवार आणि बुधवारी एकूण 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड, क्रू शॉर्टेज आणि हवामानामुळे शेकडो प्रवासी अडकले.

इंडिगोची सुरुवात कशी झाली?

2005 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी इंडिगोची स्थापना केली. त्यांचे उद्दिष्ट वेळेवर, कमी दरात आणि त्रासमुक्त सेवा देणारी भारतीय एअरलाइन तयार करणे.

भागीदारी ते वाद

दोघांनी कंपनी भक्कम उभी केली. परंतु काळानुसार मतभेद वाढले. गंगवाल यांनी बोर्ड पारदर्शकता, व्यवस्थापन नियंत्रण आणि व्यवहार प्रक्रियेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले.

वाद कोर्टात

2019 मध्ये गंगवाल यांनी सेबीकडे तक्रार दाखल केली. नंतर वाद लंडन कोर्टात गेला. या तणावामुळे कंपनीची प्रतिमा डळमळली आणि व्यवस्थापनात मतभेद वाढले.

गंगवाल यांचा राजीनामा

फेब्रुवारी 2022 मध्ये राकेश गंगवाल यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला. पुढील पाच वर्षांत आपला हिस्सा विकणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि विक्री प्रक्रिया हळूहळू सुरू केली.

सध्या कंपनीची स्थिती

इंडिगो दररोज 2,100+ उड्डाणे चालवते आणि 39,000+ कर्मचारी आहेत. परंतु अलीकडेच तांत्रिक बिघाड, खराब हवामान, हवाई वाहतुकीची गर्दी आणि वेळापत्रक बदलांमुळे ऑपरेशन्स बाधित झाले आहेत.

Next : PMO मधील सर्वात शक्तिशाली अधिकारी हितेन जोशी कोण? मोदींचे कान अन् डोळे म्हणून परिचय...

येथे क्लिक करा