Roshan More
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी हितेन जोशी यांची हकालपट्टी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आरोप केला की हितेन जोशी यांची बेटींग अॅपमध्ये गुंतवणूक आहे आणि भागीदारी आहे.
हितेन जोशी हे राजस्थानमध्ये प्राध्यापक होते. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यंमत्री असल्यापासून मोदींसोबत आहेत.
जोशी यांनी इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. आणि ते राजस्थानमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. 2008 च्या पूर्वी एका कार्यक्रमात त्यांची आणि मोदींची भेट झाली. तेव्हापासून ते मोदींसोबत आहेत.
दिल्लीच्या वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान अन् डोळे म्हणून हितेन जोशी परिचित होते.
त्यांच्यावर प्रधानमंत्री कार्यालयात कम्युनिकेशन्स आणि आईटी विभागाचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) म्हणून जबाबदारी होती.
मीडिया रिपोर्टनुसार जोशी हे रोज सकाळी पंतप्रधान मोदींना भेटत आणि सोशल मीडियावर जे काही सुरू आहे त्याची माहिती देत. महत्त्वाचे मेसेज देत.
पंतप्रधानांच्या सोशल मीडियाची रणनीती काय असावी त्याची अंमलबजावणी कशी केली जावी याची संपूर्ण जबाबादरी त्यांचीकडे होती.