Deepak Kulkarni
इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
इंडिगो कंपनीनं पुण्या,मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळावरची उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसला होता.
इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका विमान प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संतापही व्यक्त केला होता.
इंडिगोच्या गोंधळामुळं तिकिटं रद्द झालेल्या प्रवाशांना रिफंड देण्याचे आदेश सरकारनं दिले होते. तसेच इंडिगोनं प्रवाशांची माफीही मागितली होती.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी भारताच्या हवाई क्षेत्रात झेपावण्यासाठी तीन कंपन्या तयार असल्याचं जाहीर केलं आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून आता मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या विमान उड्डाणांमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं शंख एअर, एआय एअर हिंद आणि फ्लाय एक्स्प्रेस या कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली आहे. यामुळे विमानप्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.