Prashant Jagtap : शरद पवारांचा 26 वर्षे 'विश्वासू' शिलेदार; निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा; प्रशांत जगतापांनी सांभाळलीय 'ही' मोठी पदं

Rashmi Mane

प्रशांत जगताप

पुण्याच्या राजकारणात स्पष्ट भूमिका, आक्रमक नेतृत्व आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे नाव म्हणजे प्रशांत जगताप. गेली अनेक वर्षे त्यांनी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा म्हणून काम पाहिले आहे.

पक्षसंघटनेत 25 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास

प्रशांत जगताप गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. पक्षासाठी तळागाळात काम करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

2021 मध्ये पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी

2021 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकत पुणे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. या भूमिकेत त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला.

वानवडीमधून सातत्याने जनतेचा विश्वास

वानवडी भागातून प्रशांत जगताप २००७, २०१२ आणि २०१७ या तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. सातत्याने मिळालेला जनतेचा कौल त्यांच्या कामाची पोचपावती मानला जातो.

महापौरपदाचा महत्त्वाचा काळ

२०१६-१७ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौर म्हणून काम पाहिले. या काळात शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

स्मार्ट सिटी आणि मेट्रोचा ऐतिहासिक क्षवेगळी सत्ता, वेगळा संघर्ष

या काळात राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती, तर पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. महापौर म्हणून प्रशांत जगताप यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपशी ठाम संघर्ष केला.

त्यांच्या महापौर कार्यकाळात स्मार्ट सिटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हे दोन्ही प्रकल्प पुण्यासाठी मैलाचा दगड ठरले.

वेगळी सत्ता, वेगळा संघर्ष

या काळात राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता होती, तर पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. महापौर म्हणून प्रशांत जगताप यांनी अनेक मुद्द्यांवर भाजपशी ठाम संघर्ष केला.

पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

२००० साली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस आणि चिटणीस म्हणून त्यांनी काम केले. तसेच पीएमपी (PMPML) च्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

Next : बाळासाहेबांना वंदन, कुंदा ठाकरेंकडून औक्षण, युतीची घोषणा करण्यापूर्वी राज अन् उद्धव यांनी नेमकं काय केलं; पाहा PHOTOS

येथे क्लिक करा