Mangesh Mahale
आणीबाणीच्या काळात आपले वडील म्हणजे जनसंघ नेते आणि आमदार गंगाधरराव फडणवीस हे तुरुंगात असताना देवेंद्र शाळकरी विद्यार्थी होते.
वडिलांना तुरुंगात अडकविणाऱ्या नेत्या म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत, एवढे त्यांनी नीट जाणले होते.
त्यामुळेच इंदिरा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा राग उफाळून यायचा.
याबाबत त्यांच्या काही गमतीदार आठवणी देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींकडून अनेकांनी ऐकल्या आहेत.
आणीबाणीचा काळ फडणवीसांसाठी महत्वपूर्ण आहे, कारण या काळात त्यांचे वडील दोन वर्ष कारागृहात होते.
तेव्हा देवेंद्र हे पाच वर्षांचे होते, वडीलांना भेटण्यासाठी त्यांना कोर्टात किंवा कारागृहात जावे लागत असे.
आज ही आणीबाणी आणि वडीलांना कारण नसताना झालेला कारावास यांच्या आठवणी ताज्या आहेत, असे फडणवीस म्हणतात.
इंदिरा गांधी या देशाच्या मोठ्या नेत्या आहेत, पण आणीबाणीच्या काळात माझ्यासाठी मोठ्या व्हिलन होत्या, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
प्रत्येक वेळेची एक कहानी असते, इंदिरा गांधींनी देशासाठी उत्तम काम केले असल्याचे फडणवीस यांचे सध्याचे मत आहे.