Rajanand More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे फोटो ट्विट करत त्यांची आठवणच आपली शक्ती असल्याचे म्हटले आहे. आजी हिंमत आणि प्रेमाचे प्रतिक होती, असे राहुल यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनीही सोशल मीडियात आजीविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. जातनिहाय जनगणना आणि त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी करत आम्ही त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल आणि प्रियांका यांचे आजी इंदिरा गांधींसोबत खास नाते होते. नातवंडे आणि आजी एकत्रित असल्याचे अनेक फोटो आपण पाहिले असतील. त्याचे व्हिडिओशी सोशल मीडियात आहेत.
काही महिन्यांपूर्वी दोघांनी एका व्हिडिओतून आपल्या आजीच्या आठवणींना उजाळा देताना आजीला सर्वात प्रिय कोण होतं, हे सांगितले होते. आजीला सर्वात जास्त राहुल गांधी प्रिय होते, असे त्यांनी म्हटले होते.
राहुल यांनी सांगितले होते की, आजी नेहमी माझ्या बाजून असायची. मला जवळ करायची. पण वडील (राजीव गांधी) प्रियांकाला झुकते माप द्यायचे.
प्रियांका गांधींनी एक खेळण्यांचा किस्सा सांगितला होता. आजीने आणलेल्या खेळण्यांपैकी मला हवं ते खेळणं घ्यायला सांगितलं होते. आधी मला सांगितलं म्हणून मी आनंदी होते. पण नंतर कळलं की आजीने आधीच राहुलला खेळणं दिलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली.
इंदिरा गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याची आठवणही त्यांनी सांगितले. एकदा आजीला अटक केली तेव्हा आम्ही दोघे पोलिशांशी भांडलो होतो. आजीला का घेऊन चालला, असे पोलिसांना विचारल्याचे राहुल यांनी व्हिडिओत सांगितले होते.
इंदिरा गांधी यांनी प्रियांका गांधी काश्मीरला नेले होते. तेव्हा प्रियांका 12 वर्षांच्या होत्या. या दौऱ्यानंतर चार-पाच दिवसांतच इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.
प्रियांका आणि राहुल या दोघांनाही आजीकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यानंतर वडील राजीव गांधी आणि आणि आई सोनिया गांधी यांच्याकडूनही राजकारणाचे धडे गिरवले.
प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते इंदिरा गांधींची छबी म्हणून पाहतात. त्या अनेकदा साडी नसतात. त्यांची बोलण्याची पध्दत, राहणीमान आजीसारखे असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
इंदिरा गांधी यांना आपली हत्या होऊ शकते, अशी जाणीव होती. याबाबत त्या राहुल गांधींनी बोलल्या होत्या. माझी हत्या झाली तर रडू नकोस, असे त्या राहुल यांना म्हटल्या होत्या.