Ganesh Sonawane
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू-जल करार स्थगित केला आहे.
त्यामुळे पाकिस्तानची चांगली कोंडी झाली असून, पाकिस्तानातील पंजाब सिंध प्रांतात पाणीबाणीची शक्यता आहे.
सिंधू नदी ही दक्षिण आशियातील एक प्रमुख हिमालयीन नदी आहे. जी तिबेटमधील मानसरोवर सरोवर येथे उगम पावते.
सिंधू नदीचे क्षेत्र 11.2 लाख किलोमीटर इतके मोठे आहे. त्यातील 47 टक्के क्षेत्र पाकिस्तानात, 39 टक्के भारतात, 8 टक्के चीनमध्ये आणि अफगाणिस्तानात 6 टक्के क्षेत्र आहे.
या नदीची लांबी सुमारे 3,200 किलोमीटर आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे.
ही नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदींपैकी एक आहे. तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.
पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे. इग्रजी भाषेत या नदीला इंडस म्हणतात. सिंधू संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे.
सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : वितस्ता (झेलम), चंद्रभागा, इरावती, विपाशा (बियास), शतद्रू (सतलज). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे.