Pradeep Pendhare
नवीन पोप निवडीसाठी सात मे रोजीपासून काॅन्क्लेव्हला होणार असून, व्हॅटिकन सिटीमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे.
कॅथलिक समुदायाचे सर्वांत मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं 21 एप्रिल निधन झालं.
पोपची निवड पारंपरिकरीत्या कार्डिनल्स ज्येष्ठ धर्मगुरूंकडून होताना गुप्त मतदान होते.
मतदानाच्या प्रत्येक दोन फेऱ्यांनंतर मतपत्रिका चुलीत जाळल्या जातात, यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये सिस्टिन चॅपलमध्ये शेगडी उभारण्यात आली आहे.
मतपत्रिका जाळल्यानंतर सिस्टिन चॅपेलच्या चिमणीतून धूर बाहेर पडतो. यातून पोप निवडीची माहिती सिटीबाहेरील लोकांना कळते.
काळ्या धुरासाठी मतपत्रिकांबरोबर पोटॅशियम परक्लोरेट, अँथ्रासीन-कोळशाच्या टारचा घटक, सल्फर असलेली काडतुसे जाळतात.
पांढऱ्या धुरासाठी मतपत्रिकांसह पोटॅशियम क्लोरेट, लॅक्टोज आणि क्लोरोफाॅर्म रेझिन काडतुसे जाळली जातात.
चिमणीतून काळा धूर बाहेर पडल्यास मतदानातून कोणताही निर्णय झालेला नाही.
पांढरा धूर बाहेर पडल्यास मतदानातून नव्या पोपची निवड झाली असून, काॅन्क्लेव्हमध्ये त्याचा स्वीकार झाला आहे.