Jagdish Patil
आयएनएस विक्रांत कॅरियर स्ट्राइक ग्रुपमध्ये काही मिनिटांत संपूर्ण पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.
INS विक्रांत हे भारतातील पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
ही युद्धनौका विविध शस्त्रे आणि विमानांनी सुसज्ज असल्यामुळे त्याचा शत्रूंवर कारवाई करण्यासाठी चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय नौदलाने अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आयएनएस विक्रांत तैनात केलं आहे.
या युद्धनौकेच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये एक विमानवाहू जहाज, विध्वंसक, फ्रिगेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजांचा समावेश आहे.
हा ग्रुप एक मजबूत सुरक्षा कवच तयार करतो, जे अनेक सागरी ऑपरेशन्समध्ये सहभागी होऊ शकते.
हे जहाज पाकिस्तानच्या सीमेजवळ नेत भारताने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराच पाकला दिला आहे.