Jagdish Patil
देशात असे अनेक IAS-IPS अधिकारी आहेत ज्यांनी सेल्फ स्टडी करून यूपीएससी क्रॅक केली आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी असलेल्या आकांक्षा आनंद या देखील यापैकी एक आहेत.
आकांक्षा यांचा IAS अधिकारी बनण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
आकांक्षाने यांनी पाटणामधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्यांनी पाटणा व्हेटर्नरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवून त्या पशुवैद्यकीय डॉक्टर बनल्या.
त्यानंतर त्यांची सीतामढी येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. याच वेळी त्यांनी UPSC ची तयारीही सुरू केली.
पहिल्याच प्रिलिम्समध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पण निराश न होता यूट्यूबवर UPSC संदर्भातील व्हिडिओ पाहून त्यांनी सेल्फ स्टडी सुरू ठेवला.
दरम्यान, दररोज 8 ते 10 तास अभ्यास करण्याचं फळ त्यांना लवकरच मिळालं आणि दुसऱ्याचं प्रयत्नात त्या 205 व्या रँकने IAS अधिकारी बनल्या.