UPSC success story : दूध विक्रेत्याची मुलगी बनली IAS अधिकारी! ‘पहाडी गर्ल’ जाणून घ्या अनुधारा पाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Aslam Shanedivan

IAS अनुराधा पाल

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही शक्य करता येतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. IAS अनुराधा पाल असेच जिद्दीचे उदाहरण आहे

IAS Anuradha Pal | Sarkarnama

हरिद्वार

IAS अनुराधा पाल हा मुळच्या हरिद्वार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातल्या असून त्यांचे वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कुटुंब गरीब होतं, त्यामुळे अनुराधाने अभ्यासासोबत नोकरीही केली. कोचिंगची फी भरण्यासाठी त्या लहान मुलांना शिकवायच्या.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

अनुराधा पाल यांचा निर्धार

बेताची आर्थिक परिस्थिती, वडिलांचे आपर कष्ट पाहून अनुराधा पाल लहानपणीच मनात एक निर्धार केला होता की त्या शिकून खूप मोठं व्हायचं आणि ही परिस्थिती बदलायची.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

UPSC ची तयारी

त्याप्रमाणे अनुराधा यांनी मेहनत आणि योग्य दिशा यांची सांगड घातल दृढनिश्चयाने अभ्यास केला आणि त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

62 वी रँक

दोन वेळा परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी 62 वी रँक मिळवून आयएएस बनण्याचा मान मिळवला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, इच्छाशक्ती मजबूत असेल तर ध्येय गाठता येते, हेच अनुराधा यांनी सिद्ध करून दाखवलं.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

अनुराधा यांचे शिक्षण

त्यांचे हरिद्वारमधील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केले असून जीबी पंत विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

खासगी कंपनीत नोकरी

या शिक्षणानंतर त्यांनी लगेच एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. पण काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीकडे लक्ष दिले.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

पहिल्या महिला आयुक्त

2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही केली. मात्र, त्यांचा एकूण स्कोर थोडा कमी झाल्याने IAS होता आलं नाही. ज्यानंतर 2015 साली दुसऱ्या प्रयत्नात अनुराधा यांनी 62 वी रँक मिळवत आपले ध्येय साधले आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. सध्या त्या उत्तराखंडच्या पहिल्या महिला उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम करत आहेत.

IAS Anuradha Pal | Sarkarnama

पोलिस होण्याची संधी हुकली पण त्याने हार मानली नाही, आता झाला थेट उपजिल्हाधिकारी

आणखी पाहा