Ganesh Sonawane
MPSC मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल लागला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका छोट्या (चास) गावचा रवींद्र भाबड आता उपजिल्हाधिकारी झाला आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. आई-वडिलांनी मजुरी करुन त्यांचे शिक्षण केलं.
रवींद्रने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आणि उपजिल्हाधिकारी झाला.
२०१४ मध्ये पोलिस भरतीत फक्त १० मार्कांनी संधी हुकली होती. पण त्याच अपयशाने आयुष्याची दिशा बदलली.
पोलिस भरतीचा सोपा मार्ग नाकारून रवींद्रने MPSC च्या कठीण मार्गावर मेहनत घेण्याचा निर्णय घेतला.
कॉलेजमध्ये शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पार्टटाईम काम केलं, मित्रांकडून मदत घेतली आणि अभ्यास सुरू ठेवला.
“ यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो” — हा त्यांचा यशाचा मंत्र ठरला.
स्पर्धा परीक्षेचं वातावरण पुण्यात आहे, या जाणिवेने तीन-चार वर्षे तिथे राहून कठोर परिश्रम घेतले.
२०१९ मध्ये नायब तहसीलदार पदी निवड झाली होती. पण उपजिल्हाधिकारी होण्याची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. ते स्वप्न त्यांनी आता पूर्ण केलं.