Rashmi Mane
ग्लॅमरपासून वर्दीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या पुण्याच्या कशिश मेथवानीने एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
2023 मध्ये मिस इंटरनॅशनल इंडिया हा किताब जिंकलेल्या कशिशने मॉडेलिंग आणि अभिनयाची कारकीर्द बाजूला ठेवत भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच झालेल्या पासिंग-आउट परेडनंतर ती आर्मी एअर डिफेन्स (AAD) मध्ये लेफ्टनंट म्हणून अधिकृतरित्या सामील झाली.
कशिशचा जन्म पुण्यात झाला. तिचे वडील संरक्षण मंत्रालयाच्या क्वॉलिटी एश्युरन्स विभागात डायरेक्टर जनरल या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत, तर आई शोभा मेथवानी या पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या.
शैक्षणिक कारकिर्दीतही ती नेहमीच उजवी ठरली. कशिशने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी घेतली असून, बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून न्युरोसायन्स विषयात एम.एस्सी. थीसिस पूर्ण केले आहे.
कॉलेजमध्ये असतानाच तिने एनसीसी (NCC) मध्ये प्रवेश घेतला आणि सैन्याची शिस्त व काम करण्याची पद्धत जवळून अनुभवली. 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेत कशिशने संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवला होता.