आंतरजातीय विवाह केलाय? भाजप सरकार बँकेत जमा करतंय 5 लाखांपर्यंतची मदत

Aslam Shanedivan

केंद्र सरकार

देशातील जातीय भेदभाव दूर करण्यासह सामाजिक समरसता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून विविध योजना आखल्या जात आहेत.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

आंतरजातीय विवाह

याच अंतर्गत केंद्र सरकारने डॉ. आंबेडकर योजनेसह विविध राज्यांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदतीची योजना सुरू केली आहे.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

आर्थिक मदत

या योजनेतून पात्र जोडप्यांना 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

सामाजिक न्याय मंत्रालय

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारित डॉ. आंबेडकर सोशल इंटिग्रेशन स्कीम अंतर्गत डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडून राष्ट्रीय स्तरावर ही योजना राबवली जाते.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

5 लाख

राजस्थानमध्ये डॉ. सविता बेन आंबेडकर योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

अट काय?

पती किंवा पत्नीपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा तर दुसरी व्यक्ती सामान्य किंवा ओबीसी प्रवर्गातील असावी. दोघांचा हा पहिला विवाह असणे बंधनकारक आहे.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

अर्ज करण्याचा कालावधी

विवाहाची नोंदणी हिंदू विवाह अधिनियम, 1955 किंवा विशेष विवाह अधिनियमांतर्गत झालेली असावी. या योजनेसाठी लग्नानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

कर्नाटकमध्ये

या योजनेतंर्गत कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीचा पती असल्यास 2.5 लाख रुपये आणि अनुसूचित जातीची पत्नी असल्यास 3 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

महाराष्ट्रात

महाराष्ट्रात या योजनेंतर्गत 50 हजार मिळतात. मध्य प्रदेशमध्ये 2 लाख, दिल्लीत 50 हजार, तमिळनाडूत 50 हजार आणि 8 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि ओडिशामध्ये 2.5 लाख रुपयांची मदत केली जाते.

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

या कागदपत्रांची आवश्यकता

विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, जोडप्याचा संयुक्त पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संयुक्त बँक पासबुक

Central Government Marriage Scheme | Sarkarnama

E-20 Petrol म्हणजे काय? तुमच्या खिशावर अन् गाडीवर कसा होणार परिणाम? 5 सोपे मुद्दे!

आणखी पाहा