E-20 Petrol म्हणजे काय? तुमच्या खिशावर अन् गाडीवर कसा होणार परिणाम? 5 सोपे मुद्दे!

Rashmi Mane

E-20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय?

E-20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण म्हणजे E-20 पेट्रोल. भारतात इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी अचानक झालेली नाही. E-5, E-10, E-15 अशा टप्प्यांतून भारत E-20 पर्यंत पोहोचला आहे.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळतात?

E-20 म्हणजे पेट्रोलमध्ये थेट उसाचा रस मिसळला जातो, हा मोठा गैरसमज आहे. उसासह विविध स्रोतांपासून इथेनॉल तयार केला जातो. फर्मेंटेशन, डिस्टिलेशन आणि मॉईश्चर रिमूव्हलनंतर त्याची गुणवत्ता तपासली जाते.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

इथेनॉल कुठून तयार होतं?

इथेनॉलसाठी फक्त ऊसच नाही, तर मका, कृषी अवशेष आणि इतर स्रोतांचाही वापर होतो. तयार झालेल्या इथेनॉलची आवश्यक गुणवत्ता तपासल्यानंतरच त्याचा पेट्रोलमध्ये वापर केला जातो.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

इतर देशांमध्येही E-20 वापरतात?

भारत हा इथेनॉल मिश्रण करणारा पहिला देश नाही. अमेरिकेत अनेक वर्षांपासून इथेनॉल मिश्रित इंधन वापरले जाते. ब्राझील आणि युरोपातील अनेक देशांमध्येही इथेनॉल ब्लेंडिंगचा वापर केला जातो.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

पर्यावरणाला काय फायदा?

E-20 मुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. इथेनॉल मिश्रणामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही याला महत्त्व आहे.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा?

भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. इथेनॉलचा वापर वाढल्याने पेट्रोलियम आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकते. याचा परकीय चलनावरील दबाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

गाडीच्या इंजिनवर परिणाम होतो?

E-20 मुळे प्रत्येक गाडीचे इंजिन खराब होते, असे सरसकट म्हणता येणार नाही. वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी तांत्रिक बदल आणि चाचण्या टप्प्याटप्प्याने करण्यात आल्या आहेत. मात्र, जुन्या वाहनांमध्ये काही फरक जाणवू शकतो.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

Sarkarnamaकाय लक्षात ठेवावे?

E-20 बाबत भीतीपेक्षा योग्य माहिती महत्त्वाची आहे. तुमचे वाहन E-20 अनुरूप आहे का, हे वाहन कंपनीच्या मार्गदर्शिकेत तपासा. प्रत्येक वाहनातील समस्या थेट E-20 मुळेच आहे, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी तांत्रिक तपासणी आवश्यक आहे.

E20 petrol advantages and disadvantages | Sarkarnama

Next : हॉटेलच्या अन्नात किंवा औषधात गडबड? 6 सोप्या स्टेप्स वापरुन घरबसल्या करा FDAकडे तक्रार! 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा