Deepak Kulkarni
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत.
धनगर समाजाचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांना पाहिलं जातं.
पडळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीस महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली होती.
त्यांनी जिल्हा परिषद, चारवेळा विधानसभा आणि एकवेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र, पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आता त्यांना आधी भाजपकडून विधानपरिषद आणि नंतर विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली आहे.
गोपीचंद पडळकर यांचं सांगलीतील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे गाव आहे. त्यांचे शिक्षण मात्र इयत्ता 12 वीपर्यंतच झालं आहे.
रासप,वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले आमदार गोपीचंद पडळकर सध्या प्रचंड फॉर्मात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
पडळकर यांनी भाजपची मुलुख मैदानी तोफ म्हणून स्वत:ची इमेज तयार निर्माण केली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा प्रवास नेता, अभिनेता ते नेता असा राहिला आहे.
पडळकर नुसते राजकीय नेतेच नाहीत, तर लेखक आणि सिने निर्मातेही आहेत. त्यांनी सिनेमाचं लेखनासह अभिनयातही नशीब आजमावलं आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2019 मध्ये ‘धुमस’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात त्यांच्यासह अभिनेत्री साक्षी चौधरी, कृतिका गायकवाड, भारत गणेशपुरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.