Aslam Shanedivan
महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या अनिकेत कोकरे यांने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेत उत्तंग यश मिळवले.
या परीक्षेत त्याने 26 वा क्रमांक मिळवला असून तो न्यायाधीश झाला आहे. आता त्याच्या संघर्षाची चर्चा राज्यभर होत आहे.
अनिकेत कोकरे याचे यश इतरांना प्रेरणादायी असून त्यानं अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी रोजंदारीवरही काम केलं आहे
अनिकेतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल जज ज्युनियर लेव्हल अँड फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट परीक्षा 2022 दिली होती
त्याचा अंतिम निकाल 29 मार्च 2025 रोजी लागला. या पहिल्याच परीक्षेत त्याने 26 वा क्रमांक पटकावलाMPSC Success Story
न्यायाधीश झालेल्या अनिकेतचे प्रारंभिक शिक्षण बाळापूर जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे. तर नांदेड येथील नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये त्याने एलएलबी आणि एलएलएम पदव्या मिळवल्या आहेत.