Mangesh Mahale
मोदी सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत.
मध्य प्रदेशातील भाजपने महिलांना दरमहा १२५० रुपये देण्यासाठी सुरू केलेली लाडली बहना योजना गेमचेंजर ठरली.
लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन कायदा आणला.
उज्ज्वला योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिलांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात आले.
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महिलांसाठी 'हर घर जल'अंतर्गत घरोघरी नळाचे पाणी देण्याची योजना सुरू केली.
गर्भवती महिलांसाठी मातृवंदन योजना; मुलांच्या जन्मानंतर सहा हजार रुपयांची मदत.
बेटी बचाओ-बेटी पढाओ, पीएम स्वनिधी योजना, मुद्रा योजना आणि लखपती दीदीसारख्या योजना राबवल्या.
2024 च्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त असेल.
एकूण 96.8 कोटी मतदार सहभागी होतील. ४९.७ कोटी पुरुष, तर ४७.१ कोटी महिला मतदार.
2019 च्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सुमारे चार कोटींनी वाढली आहे.
R